आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील बेलगांव येथे शनिवार दि.११ नोव्हेंबर रोजी
सायंकाळी ५ ते ७ यावेळात बेलगांव येथील रेणुका माता मंदिर परिसरात आ.सुरेश धस यांचे
चिरंजीव युवानेते जयदत्त धस आणि सागर धस यांंच्या वाढदिवसानिमित्त समाजप्रबोधनकार
ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे जाहिर हरिकीर्तन होणार आहे.या
कीर्तनाचा लाभ घ्यावा असे संयोजन समिती आणि ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी
केले आहे.यावेळी राजकीय,सामाजिक , धार्मिक,शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मोठ्या
संख्येने उपस्थित राहणार आहेत.सर्वाच्या उपस्थितीत युवा नेते जयदत्त धस,सागर धस यांचे
अभिष्टचिंतन होणार आहे.वाढदिवसानिमित्त गोरगरीब ७५१ महिलांना साडीचोळी वाटप केली
जाणार आहे अशी माहिती सरपंच तात्यासाहेब शिंदे,उपसरपंच सतिष पोकळे व इंजि.प्रविण वारे
यांनी दिली.
0 टिप्पण्या