सौदंर्य अभिनय आणि लेखणीचा सुद्धा!
******************************
'...माणसाच्या जडणघडणीत
पुस्तकांची, वृत्तपत्रांची, मासिक आणि विविध अंकांची भूमिका महत्त्वपूर्ण असते.
पुस्तकांचे महत्त्व अधोरेखित करताना पुस्तक वाचनाचा व्यापक दृष्टिकोन महत्त्वाचा
आहे. जगभर भावनिक सोबत करणारी पुस्तके आणि वृत्तपत्रे ही जगण्याची हिंमत
वाढवतात..आणि प्रेरणा सुद्धा! पुस्तके हे मानवी जीवन आनंदी व अर्थपूर्ण करतात; या
विचारा सोबतच आपल्या प्रचंड ताकदवान लेखणीच्या माध्यमातून वृत्तपत्रातून विविध
मासिक दिवाळी अंकातूनही ज्ञानाचा खजिना आणि समृद्ध परंपरा अनुभवास येतात. असाच
साक्षात अनुभव सौंदर्य.ते केवळ शरीराचे नव्हे; तर अभिनयाचे आणि समृद्ध लेखणीचे
सुद्धा असते, याचा प्रत्यय आज याची डोळा याची देह आला.बीड जिल्ह्यातील प्रथित यश
पत्रकार उत्तम बोडखे यांनी गेल्या ३० वर्षाहून अधिक काळापासून हिंदू धर्म
संस्कृतीतील एक सर्वात आनंदाचा सण म्हणून साजरा केल्या जाणाऱ्या दिवाळी सणानिमित्त
विविध अंगी विविध विषय घेऊन दिवाळी अंक काढण्याची परंपरा जपली आहे.आजपर्यंत अनेक
मान्यवरांच्या शुभहस्ते या दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा राज्यातील महानगरांमधून
झालेला आहे.यंदाच्या अंकात त्यांनी अत्यंत बुद्धिमान, सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या
अनुभवी कवी, लेखकांच्या लेखणीतून समृद्ध झालेल्या साहित्याची मांदियाळी आष्टी
वार्ताहर दीपोत्सव या दिवाळी अंकातून केली आहे.या अंकाचे प्रकाशन शनिवारी मुंबई
येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गुणी अभिनेत्री केतकी माटेगावकर यांच्या शुभहस्ते
संपन्न झाले. यावेळी प्रचंड कष्ट मेहनत घेऊन हा अंक तयार करणारे या दीपोत्सवचे
संपादक उत्तम बोडखे उपस्थित होते.
चौकट
-----------
सुप्रसिद्ध अभिनेत्री केतकी
माटेगावकर सौंदर्याची खान,कोमलतेचे प्रतिबिंब आणि अभिनयाचा साक्षात्कार असा
त्रिवेणी संगम साधलेली ख्यातनाम अभिनेत्री आहे. तर लेखणीतून तीन दशकावून अधिक का

मराठवाड्याच्या वाचक संस्कृतीवर अधिराज्य गाजवणारे उत्तमराव बोडखे हे लेखणी
विश्वातील बादशहा ठरलेले आहेत.एक अभिनयाचे सौंदर्य आणि दुसरे समृद्ध लेखणीचे!
यानिमित्ताने एकत्र अनुभवायचा योग बीडवाससीयांना या निमित्ताने आला आहे.
---------------------------------------- दरम्यान,आष्टी वार्ताहर दीपोत्सव या
दिवाळी अंकातून मनुष्य जीवनाला शांतता, समृद्धी, समता, बंधुत्व, ऐक्य,
सर्वधर्मसमभाव आदी मूल्यांसह राष्ट्र प्रेमाची भावना या लेखणीतून व्हावी, यासह
दिवाळी अंकास मनःपूर्वक शुभेच्छा..! ----------------------------------------
0 टिप्पण्या