आष्टी.
पावसाने खराब झालेला भाजीपाला आणि त्याच वाढलेली मागणी यामुळे भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढले आहेत.कोथंबिर जुडी ५ रुप्यावरून २० झाली आहे.गवार १६० रू किलो तर लसूण २०० रू किलो झाला आहे.
पितृपक्ष सुरु होताच भाजीपाल्यांच्या मागणीत वाढ झाली आहे.दुसरीकडे पावसामुळे पालेभाज्या खराब होऊन उत्पादनात कमालीची घट होऊन आवक घटली आहे.परिणामी आठवडेबाजारात तरकारी मालासह भाजीपाला महागल्याचे चित्र आहे.गणेशोत्सव संपताच पितृपक्षाला सुरुवात झाली आहे.पितृपक्षात पितरांना भोजन घालण्याची परंपरा आहे.यासाठी आख्यिकेनुसार विविध प्रकारच्या भाज्यांना मागणी असते.
त्यात एक मिश्र भाजी ही अगत्याने असतेच परंतु,यंदा परतीचा पाऊस आणि त्यात अतिवृष्टीने भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवून विविध भाज्यांची बाजारात आवक घटली आहे.दरम्यान मागणी वाढल्याने भाजीपाल्याचे दर दुपट्टी,तिप्पटीने वाढून गगनालाच भिडले आहेत.यात भाज्यांची चव वाढविणारी कोथींबीरही महागली आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वी भाजीपाल्याचे दर कमालीने पडले होते.आता ते एकदम महाग झाले आहेत.
0 टिप्पण्या