Ticker

6/recent/ticker-posts

आष्टीत मराठा समाज आक्रमक शाहरातील सर्व शासकीय कार्यालयाला ठोकले कुलुप* ----------------------------- *कर्मचारी अधिकारी डांबून ठेवले*

मराठा समाज आरक्षण प्रकरणी आष्टी तालुक्यात चांगलेच वातावरण तापले आहे.बहुतांश गावात राजकीय पुढाऱ्यांना बंदी केली आहे.तहसिलदार यांची गाडी आगीत भरमसात झाली आहे.आग लावली का ? लागली ? अद्याप स्पष्ट झाले नाही अशातच सकल मराठा समाजाच्यावतीने आष्टी तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले आहे.काही कर्मचारी, अधिकारी कार्यालयातच कोंडविले आहेत.मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांना सरकारने दिलेली मुदत संपल्यानंतर पुन्हा जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आष्टी तालुक्यातील मराठा समाज एकवटला आहे. गावागावात साखळी उपोषण,कॕन्डल मार्च निघत आहेत.दि.३० ऑक्टोंबर रोजी दुपारी १२ वाजता आष्टी तहसिल कार्यालय,पंचायत समिती,दुय्यम निंबधक,पाटबंधारे, बांधकाम विभाग,पोस्ट ऑफिस,तालुका कृषी कार्यालय,वनविभाग आदीसह शासकीय कार्यालयांना मराठा समाज आंदोलकांनी कुतुप ठोकले.अधिकारी,कर्मचारी कार्यालयातच डांबून ठेवण्यात आले.मराठा समाज आंदोलकांचा तीव्र रोष दिसून आला आहे​कावरे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या