

सराटी येथे लाठीहाल्याच्या निषेधार्थ घोषणा देत आष्टीत युवकांनी मुंडण करुन केला
निषेध जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी
सकल मराठा समाजाचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांवर
पोलीसांनी लाठीमार केला याच्या निषेधार्थ आष्टी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने
आष्टी बंदचे अवाहन केले होते.या अहवानाला आष्टी, कडासह तालुक्यातील व्यापाऱ्यांनी
उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्व व्यवहार बंद ठेवत आष्टी तालुका शांततेत कडकडीत बंद
पाळण्यात आला.दरम्यान सकाळी शहरातील छञपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाचे
कार्यकर्ते जमा झाले.यावेळी जालना जिल्ह्यातील घटनेचा निषेध करत घोषणाबाजी केली.
यावेळी तरूणांनी पोलिसांनी केलेल्या लाठीहाल्याच्या निषेधार्थ घोषणा देत मुंडण करुन
निषेध केला. यावेळी आरक्षण आमच्या हाक्काचे, नाही कुणाच्या बापाचे..!, कोण म्हणतं
देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही यासह आदि घोषणा देऊन निषेध व्यक्त केला.अंबड
तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाज आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे.
यामुळे राज्यभरात वातावरण चांगलेच तापले आहे.जालन्यातील घटनेचे पडसाद संपूर्ण
महाराष्ट्रात उमटले आहेत.आष्टी,कडासह तालुकाही कडकडीत बंद ठेवून सकाळीच सर्व सकल
मराठा बांधवांकडून निषेध नोंदवून आष्टीचे तहसिलदार प्रमोद गायकवाड,पोलिस निरीक्षक
संतोष खेतमाळस यांना निवेदन देण्यात आले.आष्टी तालुक्यातील व्यापाऱ्यांनी दुकाने
बंद ठेवून पुकारलेल्या बंदला प्रतिसाद दिला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद
पाळण्यात येत आहे.जालना येथे झालेल्या लाठीचार्जमुळे राज्यभरात संतापाचं वातावरण
निर्माण झालं आहे. या घटनेच्या निषेधार्थ मराठा आंदोलकांनी बीड जिल्हा बंदची हाक
दिली आहे. बीड जिल्ह्यांमध्ये आज बंद पाळण्यात आला.या घटनेचे आज आष्टीत तालुक्यात
पडसाद उमटले.सकल मराठा बांधवांनी जालना येथे मराठा आंदोलकावर झालेल्या अमानूष
लाठीचार्जच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी ११ वाजता निषेध नोंदवला
तहसिलदार, पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले मोठ्या प्रमाणावर सर्व सकल
मराठा समाज बांधव सहभागी झाले होते.अत्यावश्यक सेवा वगळता आष्टी शहर ,कडा शहरात
कडकडीत बंद पाळण्यात आला.यावेळी नगराध्यक्ष जियाभाई बेग, अनिलतात्या ढोबळे,
भाऊसाहेब लटपटे,सुनिल रेडेकर,भागचंद झांजे,जालिंदर वांढरे,डॉ.नदीम शेख,प्रा.शशीकांत
कन्हेरे,जगताप, सरपंच अशोक मुळे, ज्ञानदेव राऊत,शाहादेव नरवडे, निलेश सोनवणे,
आत्माराम फुंदे आदी पदाधिकारी, मराठा समाजाचे युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या