Ticker

6/recent/ticker-posts

धनगर समाजाचा आरक्षणासाठी आष्टीतील अहिल्यादेवी चौकात भर पावसात रस्ता रोको

आष्टी धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आष्टी तालुक्यातील धनगर समाजाच्यावतीने शहरातील आहिल्यादेवी चौकात भर पावसात नगर-बीड महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले.या आंदोलनात आष्टी तालुक्यातील धनगर समाजाने तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी समाजाच्यावतीने समाजाला एस.टी.प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे व एस. टी.च्या सर्व सवलती समाजाला देण्यात यावेत. धनगर आणि धनगड ही एकाच जातीचे नावे आहेत.शब्दाच्या उच्चारायचे अडचण निर्माण झाली आहे.देशातील इतर राज्यात धनगर समाजाला एस.टी.मधुन आरक्षण देण्यात आलेले आहेत.इतर राज्यातील आरक्षणाचा अभ्यास करून महाराष्ट्रातील धनगर समाजाला आरक्षण द्यावे.धनगर आणि धनगड हे एकाच जातीचे नाव आहे.त्यामुळे राज्य सरकारने येत्या दोन महिन्यात धनगर समाजाला एस.टीचे प्रमाणपत्र देण्यात यावे नसता धनगर समाज येणाऱ्या निवडणुकीत समाजाची गळचेपी करणाऱ्या राजकीय पक्षांना त्यांची जागा दाखवुन दिल्याशिवाय राहणार नाही. मावळे आम्ही अहिल्याचे दुबळे आम्हाला समजु नका असे म्हणत आरक्षण मिळेपर्यंत धनगर समाज शांत बसणार नसल्याचे समाजाच्यावतीने राज्य सरकार इशारा दिला आहे.भर पावसात समाजाच्या वतीने नगर-बीड महामार्गावर ठ्ठिया दिला.यावेळी समाजातील अनेक नेते मंडळी उपस्थित होते.बीड जि.प.माजी अध्यक्ष डॉ.शिवाजी राऊत,जिल्हा परिषद सदस्य रामहरी महानोर,अशोक ढवण,पमा खेडकर,भाऊसाहेब धोरमते,मदने,दादासाहेब पारखे,संतोष शिंगडे,महादेव दिंडी डॉ.तांबे, शांतीलाल ओव्हाळ,पानसरे,संजय पांढरे, यांच्यासह तालुक्यातील धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या