Ticker

6/recent/ticker-posts

पाथर्डीकर गणेश भक्तांसाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या अदाकरीची पर्वणी! ----------------------------- जगदंबा प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रम -- ॲड.प्रतीकदादा खेडकर

आष्टी तमाम पाथर्डीकर गणेश भक्तांसाठी मराठी सिने सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या अदाकरीची पर्वणी लाभणार असून पाथर्डी येथील ज्येष्ठ युवा कार्यकर्ते आणि जगदंबा प्रतिष्ठानचे ॲड. प्रतीकदादा खेडकर यांच्या पुढाकारातून ही संधी प्राप्त होणार आहे.यापूर्वी जगदंबा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी अत्यंत पवित्र उत्साह पूर्ण वातावरणातील गणेशोत्सवामध्ये विविध सामाजिक,धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होत आली आहे.यंदाही जगदंबा प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव २०२३ मध्ये विविध धार्मिक,सामाजिक,शैक्षणिक कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात आले आहे.युवानेते ॲड.प्रतीकदादा खेडकर यांनी त्यांच्या असंख्य पदाधिकाऱ्यांना सोबत घेत आणि गणेशभक्तांच्या आणि भाविक भक्तांच्या सहकार्याने यंदा गणेश भक्तांच्या ज्ञानार्जन आणि करमणुकीसाठी मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना खास विशेष आमंत्रित केले आहे.तिचे या गणेश मंडळाच्या मंचावर सोमवारी आगमन होणार आहे.गणेशभक्तांशी ती आपल्या कला अदाकारीसह संवाद साधणार आहे.जगदंबा प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने पाथर्डी व तालुक्यामध्ये अत्यंत पवित्र अध्यात्मिक सुगंधी वातावरण तयार झाले असून श्री गणेश येत्या काळात गणेश भक्तांच्या इच्छा पूर्ण करून शेतकरी ऊसतोड कामगारांच्या आणि सर्वसामान्यांच्या जीवनात सुख यश आनंद आणि भरभराट आणेल असा विश्वास जगदंबा प्रतिष्ठानचे ॲड.प्रतीकदादा खेडकर यांनी व्यक्त केला आहे.पाथर्डी शहराचा वैभव असणारा आणि विविध सामाजिक उपक्रमांतून सर्वांच्या पसंतीस उतरलेला जगदंब प्रतिष्ठान गणेशोत्सव पाथर्डी २०२३ च्या अध्यक्ष निखिल चिंतामणी,उपाध्यक्ष अजय विघ्ने, खजिनदार सौरभशेठ दानापुरे यांनी जगदंब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲड.प्रतिकदादा खेडकर यांंच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवानिमित्त यावर्षी दि.२५ सप्टेंबर रोजी मंडळाचे सर्व सदस्यांच्या अनुमतीने मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना निमंत्रित केले आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमास खा.डाॕ.सुजयदादा विखे,आ.मोनिकाताई राजळे हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत.पाथर्डी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मुख्यसंयोजक ॲड.प्रतिकदादा खेडकर यांनी केला
आहे. ------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या