Ticker

6/recent/ticker-posts

सूर्य-चंद्र असेपर्यंत संत भगवानबाबांच्या विचारांचा तेजस्वी प्रकाश राहील- ह.भ.प.मोहन महाराज खरमाटे --------जन्मोत्सवाच्या निमित्ताने भाऊ- बाबा प्रतिष्ठान येथे कीर्तन सेवा

'राष्ट्रसंत भगवान बाबांनी आपल्या आयुष्यभर गोरगरीब दिंनलित दुबळ्या अनाथ अपंग शेतकरी शेतमजूर,वंचित घटकांसह ऊसतोड कामगारांच्या जीवनात शिक्षण आणि संस्काराच्या माध्यमातून क्रांती घडवली त्यांचे हे तेजस्वी विचार अखंड,कायम,शाश्वत चंद्र सूर्य असेपर्यंत राहतील असा ठाम विश्वास ज्येष्ठ कीर्तनकार ह भ प मोहन महाराज खरमाटे यांनी बीड येथील भाऊ- बाबा प्रतिष्ठान येथे १२७ व्या.जन्मोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कीर्तन सेवेत केला. यावेळी विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांसह भाविक भक्त उपस्थित होते. बीड येथील इंद्रप्रस्थ कॉलनी मध्ये संत भगवान बाबा व संत वामनभाऊ प्रतिष्ठानच्या वतीने यंदा चौदाव्या वर्षी राष्ट्रसंत भगवान बाबांच्या १२७ व्या.जयंतीच्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होते. आज सोमवारी ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प.मोहन महाराज खरमाटे यांची सुश्राव्य कीर्तन सेवा पार पडली. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे निरूपण करताना त्यांनी संतांची समाजसेवेसाठी असलेली भूमिका निर्विवाद असल्याचे सांगत त्यांचे अनंत उपकार समाजावर असल्याचे सांगितले.त्यांनी यावेळी विविध दृष्टांत देत समाजाच्या हितास्तव समता व परिवर्तनासाठी संतांची भूमिका विषद केली. यावेळी आमदार संदीपभैय्या क्षीरसागर,प्रा.सुशीलाताई मोराळे,माजी आमदार उषाताई दराडे,ज्येष्ठ विधीज्ञ अँड.मंजुषा दराडे, शिवसंग्रामचे अनिल घुमरे,शेषराव तांबे,अंकुश राठोड,नितीन जायभाये,वैजनाथ सानप,ह.भ.प.नामदेव महाराज मुंडे,गुणवंत शिक्षक सर्जेराव वारे,धनंजय सानप,एम.डी.पांचाळ,ज्ञानदेव आगलावे,रामदास नागरगोजे,कचरू चव्हाण, उत्तम दोडके,प्रवीण सानप,केशव तांदळे,प्रा. विष्णू सोनवणे,आर.के.भोंडवे,जगन्नाथ कांबळे,श्रीमंत तांदळे,अश्रुबा नागरगोजे, किसन माने,श्रीराम सानप आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर,भाविकभक्त उपस्थित होते. भाऊ -बाबा प्रतिष्ठानचे मुख्य विश्वस्त सामाजिक कार्यकर्ते डॉ.राजेंद्र सानप यांनी उत्तम नियोजन केले.महाप्रसादाने सांगता झाली.यावेळी संत भगवान बाबांच्या कार्याविषयी गेल्या अनेक दशकांपासून सातत्याने अविरत आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रामाणिक कर्तव्य निभावणाऱ्या प्रा.बिभिषण चाटे यांचा माजी आमदार उषाताई दराडे,जेष्ठ विधीज्ञ मंजुषाताई दराडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.डॉ.राजेंद्र सानप यांनी सर्वांचे स्वागत करून आभार मानले. ----------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या