उत्तम बोडखे,आष्टी. ------------------------- बीड जिल्ह्याच्या इतिहासात दुर्मिळ
योगायोग घडला आहे.नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात बीडचे भूमिपुत्र असलेल्या
कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे आणि कृषी आयुक्त सुनिल चव्हाण हे कृषी क्षेत्रातील
सर्वोच्च पदावर एकाच जिल्ह्यातील भूमिपुत्र महाराष्ट्राला लाभले आहेत. यानिमित्ताने
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळणार? अशा अपेक्षा व्यक्त केल्या जात
आहेत.महाराष्ट्र राज्याच्या नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात बीड
जिल्ह्याच्या परळी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आमदार धनंजय मुंडे यांना
कॅबिनेट कृषी मंत्री म्हणून शपथविधी झाला आहे तर बीड जिल्ह्याच्याच आष्टीचे सुपुत्र
सुनिल चव्हाण हे राज्याचे कृषी आयुक्त म्हणून काही महिन्यांपासून कार्यरत आहेत.
चव्हाण यांनी रत्नागिरी आणि औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून हे उत्तम कामगिरी
केलेली आहे.अशा या बीड जिल्ह्यातील भूमिपुत्रांना अत्यंत महत्त्वाचे खाते असलेल्या
कृषी मंत्री आणि कृषी आयुक्त पदावर एकत्र काम करण्याची संधी मिळत आहे. काल शनिवारी
मंत्रालयात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत महत्त्वपूर्ण
पहिली बैठक पार पडली. यावेळी त्यांच्या समवेत राज्याच्या कृषी खात्याचा आढावा
मांडण्यासाठी राज्याचे कृषी आयुक्त सुनिल चव्हाणसाहेब सोबत उपस्थित होते. त्यांच्या
अधिपत्याखालील अनेक कृषी खात्यातील अधिकारी यांनी एकूण राज्याच्या कृषी क्षेत्राचा
सविस्तर आढावा मा. मंत्री महोदयांसमोर मांडला. यावेळी मंत्री महोदयांनी अनेक
महत्त्वपूर्ण बाबींना आधोरेखित करीत भविष्यात शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना
आखण्यासंदर्भात वाटचाल केल्याचे दिसले.या बैठकीतील या बीड जिल्ह्याच्या कृषी
क्षेत्रातील सर्वोच्च भूमीपुत्रांचे एकत्रित छायाचित्र अभिमानाने सोशल मीडियावर
मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले.दरम्यान,हा बीड जिल्हावासियांसाठी अभिमानाचा क्षण
असून बीड जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी बांधवांना नक्कीच न्याय मिळवून देतील अशा
अपेक्षा आता वाढल्या आहेत.
0 टिप्पण्या