Ticker

6/recent/ticker-posts

माजी आ.भीमराव धोंडे यांच्या मार्गदर्शनाखालील टिफीन बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देशभरात महासंपर्क अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत धानोरा गटातील दादेगाव येथे आयोजित करण्यात आली होती.या टिफीन बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दादेगाव येथील श्रीराम मंदिरात टिफीन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी मार्गदर्शन करताना भाजपा नेते माजी आ.भीमराव धोंडे सांगितले की,केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकार चांगले काम करीत आहेत. शेतकऱ्यांसाठी एक रुपयांत पीकविमा योजना राबविण्यात आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशासाठी हिरा आहेत.भारत देशाला प्रथमच नरेंद्र मोदी सारखा जागतिक पातळीवर काम करणारा महान व्यक्ती लाभला आहे. लोकनेत्या पंकजाताई मुंडे पालकमंत्री असताना जिल्ह्यात मोठ्या ं मीप्रमाणात विकास कामे झाली.खा.प्रितमताई मुंडे यांच्यामुळे देखील केंद्र सरकारचा मोठा निधी मिळत आहे.आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गट आणि गणात अशा प्रकारे टिफीन बैठक घेण्यात येईल असेही माजी आ.भीमराव धोंडे यांनी सांगितले. यावेळी वाल्मिकतात्या निकाळजे, भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव म्हस्के व इतरांची भाषणे झाली. याप्रसंगी भाजपा युवा मोर्चा बीड जिल्हा सरचिटणीस डॉ.अजयदादा धोंडे, युवानेते अभयराजे धोंडे,भाजपा आष्टी तालुकाध्यक्ष ॲड.साहेबराव म्हस्के, ॲड.वाल्मिकतात्या निकाळजे, जि.प.सदस्य सुरेश माळी, नौबाबुसेठ भंडारी, भाजपा बीड जिल्हा सचिव शंकर देशमुख, सरपंच सावता ससाणे,नन सरपंच भाऊसाहेब कोकरे, सरपंच ज्ञानेश्वर वाघ,सरपंच सोमनाथ गायकवाड,सरपंच दादासाहेब जगताप, बाबासाहेब गर्जे, सतीशमामा झगडे, एन.टी.गर्जे, माजी पंचायत समिती सदस्य संजय धायगुडे, माजी सरपंच चंद्रशेखर साके,बबनराव औटे,संदीप नागरगोजे, आण्णासाहेब लांबडे, हरिभाऊ तांदळे,बाबा ससाणे , गौतम ससाणे, नय्युम शेख, सदाभाऊ दिंडे आदि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांचे आभार संदीप नागरगोजे यांनी मानले. ंुऔऔ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या