
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या राज्यातील अंमलबजावणीच्या अनुषंगाने दि.२६ जुलै
रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहच्या निमित्ताने येथील भगवान
महाविद्यालयात विद्यार्थी,पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये या धोरणाच्या अंमलबजावणीत
येणाऱ्या अडीअडचणी-समस्या इत्यादींच्या निराकरणासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
करण्यात आले होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य
डॉ.दत्तात्रय वाघ हे होते.प्रमुख अतिथी म्हणून शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे
प्रशासकीय अधिकारी श्री संजय शेंडे तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ.ज्ञानदेव वैद्य हे
उपस्थित होते. त्यांनी उपस्थित विद्यार्थी,पालक व शिक्षक यांना या नवीन शैक्षणिक
धोरणाच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडीअडचणी व समस्या यावर सविस्तर असे मार्गदर्शन
करून विद्यार्थी व पालकांच्या समस्यांचे निराकरण केले. प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ
यांनी या धोरणाची रूपरेषा स्पष्ट करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.ही कार्यशाळा
यशस्वी करण्यासाठी डॉ. दिगंबर पाटील,डॉ.बाळासाहेब गावडे, डॉ.दीपक टेकाडे, डॉ.वंदना
घोडके,डॉ. नामदेव वाघुले व इतर सर्वच सहकार्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनईपी(NEP) सेलचे समन्वयक डॉ. रामदास कवडे यांनी केले तर
उपस्थित मान्यवरांचे आभार डॉ. बाबासाहेब झिने यांनी मानले.या कार्यशाळेसाठी
विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या