Ticker

6/recent/ticker-posts

आ.सुरेश धस यांच्या प्रयत्नातून मतदारसंघातील रस्ते कामासाठी भरघोस निधी मंजूर ----गणेश शिंदे ****************************** रुटी-खानापूर रस्तासाठी २.५० कोटी निधी मंजूर ******************************* आष्टी,
पाटोदा तालुक्यातील विविध रस्त्याच्या कामासाठी आ.सुरेश धस यांच्या विशेष प्रयत्नातुन ६०५ कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर करून घेतला असून यामध्ये विशेष करून आमचा अत्यंत महत्त्वाचा असलेल्या रुटी-खानापूर ३ कि.मी.अंतराचा रस्तासाठी २.५० कोटी निधी मंजूर केल्याबद्दल आ.धस यांचे परिसरातील नागरिकांनी आभार मानले असल्याचे भाजपा नेते गणेश शिंदे म्हंटले आहे. पुढे बोलताना गणेश शिंदे म्हणाले,आष्टी तालुक्यातील रुटी-खानापूर हा रस्ता वाहतूक वर्दळीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेल्या दुरवस्था लक्षात घेता या रस्त्याचे काम करावे म्हणून या भागातून आ.सुरेश धस यांच्याकडे वेळोवेळी मागणी होत होती. अखेर आण्णांनी यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून या रस्त्यासाठी २ कोटी ५० लक्ष रुपये निधी मंजूर करून घेतला आहे. या रस्त्यावर दूध व्यवसाय आणि ऊस उत्पादक शेतकरी मोठया प्रमाणावर आहेत.त्यांची रस्त्यांमुळे होणारी हेळसांड आत्ता थांबणार असून दळणवळणाचा मोठा प्रश्न मार्गी लागल्याने समाधान व्यक्त केले आहे. त्याचबरोबर मतदारसंघात लोणी-वृद्धेश्वर दोन्ही जिल्ह्याला जोडणारा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला ५० कि. मी अंतराच्या रस्त्यासाठी ६०० कोटी रुपयांच्या निधी मंजूर केला आहे.याच बरोबर पाटोदा तालुक्यातील पिपळवंडी,अंबेबाडी,चंद्रेवाडी रस्त्याच्या कामासाठी २ कोटी ५० निधी मंजूर केला आहे.या तिन्ही कामांना भरघोस निधी मंजूर केल्याबरोबर या भागातील अनेक प्रश्न आ.सुरेश धस यांनी सोडवले असल्याने परिसरातील ग्रामस्थांनी जाहीर आभार मानत समाधान व्यक्त केले.यंदाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भरीव निधीची तरतूद झाल्याने मतदारसंघात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.यामुळे मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्ते विकासाचा बॅकलॉग भरून निघणार असून ग्रामीण रस्त्यांना आजतागायत तुटपुंजा निधी मिळत असल्याने वर्षानुवर्ष रस्त्यांची कामे पूर्ण होत नव्हती.आ.सुरेश धस यांच्या वेळोवेळी पाठपुराव्याने तसेच सातत्यपूर्ण जनतेशी नाळ असल्याने मतदारसंघाचा कायापालट होत असल्याचे पाहायला मिळत आहे.ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. ग्रामीण भागात चांगल्या रस्त्यांच्या माध्यमातून विकासाचे नवे पर्व सुरू होणार असून लवकरच नागरिकांना चकाचक आणि टकाटक रस्ते मिळणार आहेत. एकट्या आष्टी मतदारसंघातील रस्त्यांना ६०५ कोटींचा निधी मंजूर झाल्याने आ.सुरेश धस यांचे आभारी असल्याचे गणेश शिंदे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या