
आजचा बालक हा उद्याचा भविष्याचा सशक्त नागरिक असतो. त्या दृष्टीने आजच्या छोट्या चिमुकल्यावर योग्य संस्कार, योग्य दिशा देण्याची गरज आहे. अगदी याच हेतूने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवशाहीर विजय तनपुरे यांची कारकीर्द सामाजिक बांधिलकीची म्हणून ओळखली जाते. शिवशाहीर विजय तनपुरे आष्टी त एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी एका चिमुकल्या बालकाला मांडीवर घेत त्याला भविष्याची योग्य दिशा दाखवली.शिवशाहीर विजय तनपुरे हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवशाहीर आहेत गेल्या चार दशकापेक्षा अधिक काळ त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह राष्ट्रपुरुष आणि लोकनेत्यांच्या अशा दिग्गज कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या पोवाड्यांची निर्मिती केली आहे.
गेल्या आठवड्यात म्हणजे ६ जून २०२३ रोजी मंगळवारी संध्याकाळी शाहीर विजय तनपुरे बीड जिल्ह्याच्या आष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांच्या पहाडी आवाजातील सुश्राव्य पोवाडा गायनाची संधी तमाम आष्टीकरांना मिळाली कार्यक्रमाला प्रारंभ होण्यापूर्वी उपस्थित दैनिक झुंजारनेताचे उपसंपादक तथा वरिष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांचे नातू रियांश राकेश बोडखे हा चिमुकला त्यांना दिसताच त्यांनी क्षणाचाही विलंबना लावता त्याला आपल्या मांडीवर घेतले रियांश हा सुद्धा कसलीही भीती न बाळगता उपस्थित समुदायाकडे पाहत राहिला.
समाजकार्याची दिव्यदृष्टी लाभलेल्या शिवशाहीर विजय तनपुरे यांच्या राष्ट्रप्रेमाची आणि छत्रपती शिवरायांच्या कारकिर्दीवर आपल्या अत्यंत सुमधुर आणि पहाडी आवाजातील आणि संगीतमय टीमच्या साथीने सादर केलेला पोवाडा कार्यक्रम तमाम आष्टीकर यांच्या हृदयावर स्थान निर्माण करणारा ठरला.
0 टिप्पण्या