आष्टी तालुक्यातील पिंपरीघुमरी येथील ग्रामपंचायत कार्यालय आणि ग्रामस्थांच्या
हस्ते दहावी बोर्ड परीक्षेत विशेष यश संपादन केलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा
गुणगौरव सोहळा संपन्न झाला.मार्च २०२३ मध्ये झालेल्या दहावी बोर्ड परीक्षेत गावातील
गुणवत्ता संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, प्रेरणा देण्याच्या दृष्टीने
गावचे सरपंच दादा पांडुळे व सर्व ग्रामपंचायत सदस्य,शिक्षणप्रेमी ग्रामस्थांनी
अतिशय सुंदर आणि मनमोहक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ९८.६्० टक्के मिळवून
सर्वप्रथम आलेल्या प्रथमेश उढाणे सोबतच वृषाली जगताप ९८.४० टक्के, प्रणिता परकाळे
९७.६० टक्के, साक्षी पांडूळे ९२.६० टक्के, वैष्णवी वारूळे ९१.६० टक्के, आदित्य
पोकळे ९१.६० टक्के, कोमल पांडूळे ९१ टक्के, वैष्णवी पांडूळे ९०.८० टक्के, ऋतुजा
पांडूळे ९०.६० टक्के,कोमल पांडूळे ९०.४० टक्के,सार्थक पांडूळे ८९.६० टक्के, स्नेहा
क्षिरसागर ८९.२० टक्के,दिपक पांडूळे, सार्थक पांडूळे,पूनम परकाळे, राजश्री
गांगर्डे,आत्माराम सुंबरे,परशुराम घुमरे,आदिती पांडुळे,तृप्ती परकाळे,तुषार
जगताप,सक्षम पांडूळे,प्राजक्ता खिळे,आदित्य पांडूळे या गुणवंत विद्यार्थ्यांचा
गुणगौरव करण्यात आला.जिद्द,चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर आपणास यश संपादन करता
येते असे प्रतिपादन अशोक उढाणे यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप
पांडूळे हे होते तर प्रास्ताविक सरपंच दादा पांडुळे यांनी केले.यावेळी विवेकानंद
शिक्षक पतसंस्थेचे संचालक दिलीप उढाणे, भाऊसाहेब वारूळे, मुख्याध्यापिका विमल
जगताप,गोरख वारूळे सर, रावसाहेब साबळे सर, नितीन क्षीरसागर, विद्यार्थ्यांमधून
आदित्य पांडूळे यांनी मनोगत व्यक्त करून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा
दिल्या. यावेळी महाराष्र्ट राज्य सरपंच परिषदेच्यावतीने तेलंगना राज्यास भेट देवून
आलेले सरपंच दादा पांडूळे यांचा उपस्थितांकडून सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्यांना
प्रेरणादायी असणार्या या कार्यक्रमास शिक्षणप्रेमी नागरीक व ग्रामस्थ मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या