भारतीय जनता पार्टी, आष्टी,पाटोदा,शिरूर विधान सभा मतदार संघाचे भाजप नेते माजी आ.भीमराव धोंडे यांच्या उपस्थितीत ९ वा. जागतिक योग दिन आष्टी शहरामधील आनंद शैक्षणिक संकुलाच्या कृषी महाविद्यालयाच्या मैदानात दि.२१ जुन रोजी सकाळी.७ वा. संपन्न झाला.यावेळी बोलतांना माजी आ. भीमराव धोंडे म्हणाले की,भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये 'जागतिक योग दिन हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. भारतातच नव्हे तर जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.आष्टीतील आनंद शैक्षणिक संकुल गंगाईनगर येथे योग दिन साजरा केला. यावेळी उपस्थित युवा नेते अभयराजे धोंडे, तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, योगगुरु प्रा.भा.दे.जगताप,भाजपा बीड जिल्हा सचिव शंकर देशमुख,सरपंच अभय गर्जे,जेष्ठ नेते बाबुसशेठ भंडारी,रत्नदीप निकाळजे, पत्रकार उत्तम बोडखे,युवा नेते आस्ताक शेख, बप्पा डोरले,प्राचार्य डॉ. श्रीराम आरसुळ ,प्राचार्य डॉ.बाळासाहेब खेमगर ,प्राचार्य डॉ.कोल्हे सुनिल,प्राचार्य संजय बोडखे, प्राचार्य साईनाथ मोहळकर आणि आनंद शैक्षणिक संकुल मधिल सर्व प्राध्यापक, विद्यार्थी आदि मान्यवर उपस्थित होते..

0 टिप्पण्या