माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडिया वरून धमकी देण्यात आल्याप्रकरणी आष्टीत रविवारी दि.१९ जुन रोजी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले.दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मिडीयावरून सौरभ पिंपळगांवकर या व्यक्तीने धमकी दिली होती.याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत.राष्ट्रवादीचे कार्यकर्तेआक्रमक झाले असून रविवारी राष्ट्रवादी कडुन याप्रकरणाचा निषेध करण्यात आला.यावेळी तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.तहसीलदार आर.व्ही.शिंदे,पोलिस निरीक्षक हेमंत कदम यांना कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते महेश आजबे,तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी,युवक तालुकाध्यक्ष भाऊसाहेब घुले,माजी जि.प.अध्यक्ष डॉ.शिवाजी राऊत,नगरसेवक नाजीम शेख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या