आष्टी शहरातील सुप्रसिद्ध उद्योजक बबनदादा शिंदे
यांनी आष्टी शहरासह तालुक्यात उद्योग क्षेत्रामध्ये
यशस्वी भरारी घेतली असतानाच त्यांचे धार्मिक
क्षेत्रातील योगदान संस्मरणीय ठरले आहे.यंदाच्या
आषाढी वारीसाठी मच्छिंद्रनाथगडाच्या पायी दिंडी
सोहळ्यात वारकऱ्यांसाठी चहापाणी फराळाची
सोय करत स्वतः सहभागी होऊन हा विहंगम
अध्यात्माचा आनंद दादांनी घेतला!
आष्टी शहरातील खडकत रोडवरील राजे
संभाजी उद्योग समूहाच्यावतीने गेली दोन वर्षांपासून
पंढरपूरकडे जाणा-या प्रत्येक दिंडीचे सामाजिक
कार्यकर्ते बबनदादा शिंदे आणि अमोलराजे शिंदे
हे पिता -पुत्र स्वागत करतात आणि सर्व पायी
दिंड्यांना चहा पाणी आणि फराळाची व्यवस्था
करतात.हे त्यांचे सामाजिक व धार्मिक कार्य
कौतुकास्पद आहे.जवळपास शंभर पायी दिंड्यांचे
शिंदे परिवाराच्यावतीने श्रीफळ देऊन स्वागत व
शुभेच्छा दिल्या जातात.दि.१६ ते २२ जुन या
कालावधीत हा उपक्रम शिंदे परिवाराच्यावतीने
राबविण्यात आला होता.बुधवार दि.२१ जुन
रोजी आष्टी तालुक्यातील सावरगांव येथील
संजीवन समाधी स्थळ असलेल्या मच्छिंद्रनाथ
देवस्थानच्या पायी दिंडीतील वारकऱ्यांचे
स्वागत शिंदे यांनी स्वागत करून चहा पाणी
आणि फराळाची चांगली व्यवस्था केली.
आष्टी तालुक्यातील चिखली येथील सामाजिक
कार्यकर्ते बबनदादा शिंदे आणि पैलवान अमोल
शिंदे या पिता पुत्राचा सामाजिक व धार्मिक
आणि पुण्यप्राप्तीचा उपक्रम केला आहे.
आष्टी येथे राजे संभाजी उद्योग समूहाच्यावतीने
सामाजिक उपक्रम राबविला जात आहे.या त्यांच्या
उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.दरवर्षी प्रमाणे
यावर्षी पंढरपूरकडे जाणा-या प्रत्येक दिंडीतील
वारकऱ्यांचे स्वागत करून त्यांना पाणी चहा आणि
फराळाची व्यवस्था केली जाते. त्याचप्रमाणे आष्टी
तालुक्यातील प्रसिद्ध असलेले देवस्थान
मच्छिंद्रनाथगडाच्या दिंडीतील वारकऱ्यांचे बुधवारी
आष्टीत स्वागत केले. त्यांच्यासाठी पाणी, चहा,
फराळाची व्यवस्था केली. यावेळी देवस्थानचे
अध्यक्ष दादासाहेब चितळे सर,ह.भ.प.भानुदास
महाराज चव्हाण, शिवाजी महाराज,ह.भ.प.सुखदेव
महाराज,संजय मस्के,पोपट मस्के, विक्रम भगत,
सरपंच बाळू मस्के,चेअरमन नवनाथ म्हस्के,
मोहनतात्या म्हस्के,राजूदादा म्हस्के,अनिल मस्के,
गोरख मस्के,विठ्ठल गिरी, बीड जि.प.चे माजी सदस्य
महादेवनाना शिंदे,
शांतीलाल घोलप,संभाजी कोकणे,
नवनाथ चखाले, सोमनाथ शिंदे,परसराम आवारे,सलिम पठाण आदी उपस्थित होते.

0 टिप्पण्या