
उन्हाळी सुट्टीतील कालावधीचा योग्य फायदा घेऊन आष्टीतील उच्चशिक्षित गुणी जणांनी नैसर्गिक जैवविविधतांची पाहणी करून आस्वाद घेण्यासाठी दूरची टूर आरंभिली आहे.त्यांचा पुणे ते थेट दिल्ली विमान प्रवास आणि
तेथील विविध पहाडरांगा झाडे व लक्षवेधी आणि गगनचुंबी पर्वत,या पाहाडाच्या डगरीवर गगनचुंबी इमारती, कडक मे उन्हाळ्यात कायम वातानुकूलित हवा , अंगाला झोंबणारा गारवासह विविधता पाहून एक निसर्गाच्या चमत्कारिक घटनांचा आस्वाद घेतला आहे.मे महिन्यात असा कडक उन्हाळ्याच्या दिवसांचा कालावधी.याच महिन्याच्या गेल्या आठवड्यात
आष्टी तालुक्यातील कडा येथील आनंदराव धोंडे महाविद्यालयाचे प्राचार्य
व उपप्राचार्य,ज्येष्ठ प्राध्यापक,निवृत्त अधिकारी,कर्मचारी तसेच पत्रकार,
वकील मंडळी यांच्या एकूण बारा जोड्या नैनीतालसाठी रवाना झाल्या
आहेत. जिम कार्बेट टायगर रिझर्व्ह एरिया, कौसानी,
म.गांधी यांचा अनासक्ती आश्रम,उत्तुंग हिमालय पर्वत रांगेचे नजर दर्शन,चहाचा मळा भेट,वुलनकारखाना भेट,बैजनाथ मंदिर, राणीखेत,
कैची धाम,नीबकरौरी बाबा आश्रम,
नैनी लेक,मालरोड,नैनिताल,नैनादेवी मंदिर,इको केव्ह गार्डन,भीमताल,सतताल,नौकुचीताल,
खुर्पुताल,सुखताल,वुडलन्ड वाटर पार्क पाहुन दिल्ली एअरपोर्ट ड्रॉप असा त्यांचा प्रवास आहे.पुणे ते जयपूर विमान प्रवास आणि जयपूर ते दिल्ली
विमान प्रवास आणि दिल्ली ते नैनीताल लक्झरी बस प्रवास अशी आठवडाभराची ही सहकुटुंब सहल आहे.या निसर्गसहलित मुख्य
संयोजक प्राचार्य डॉ. हरिदास विधाते (कडा), प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ (आष्टी), उपप्राचार्य डॉ.भास्कर चव्हाण (कडा),उपप्राचार्य प्रोफेसर डॉ.संभाजी वाघुले,उपप्राचार्य डॉ. बापू खैरे ,प्रा.भीमराव जिवे, प्रा.दिलीपराव बनसोडे (बीड), सेवानिवृत्त सेवायोजन अधिकारी अशोक गिरी (अहमदनगर),जयंत जोशी (अहमदनगर), कृषी अधिकारी बाळासाहेब रासकर (श्रीगोंदा), प्रा.डॉ.पंडित औटे,ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे या मान्यवरांनी यात्रीगण हालीडेज अहमदनगर या यात्रा कंपनीमार्फत
सपत्नीक टूर केली आहे.अचानक युवा नेते अजयदादा भीमराव धोंडे
यांची नैनीताल येथे भेट झाली....
या ग्रुपने त्यांच्यासोबत फोटोशेषन केले....
-----------------------------------------------------------------------------------
निसर्गाची मानवाला अनमोल देण!
------------------------------ -
मानवी जीवन व्यवस्थेला भारत मातेच्या विविध भागांमध्ये विविध डोंगर
रांगा ,झाडा, फुलांनी वेढलेले परिसर त्यातून विविध रस्ते इमारती आणि
अशा उपक्रमांनी नटलेले हे विश्व म्हणजे मानवी जीवनाला निसर्गाने दिलेली
ही फार मोठी देणगी आहे अशी प्रतिक्रिया या नैसर्गिक सहलीतील सहभागी जेष्ठ प्राचार्य डॉ.हरिदास विधाते यांनी व्यक्त केली.
------------------------------ ------------------------------------------------------

0 टिप्पण्या