विवाहासाठी नातेवाईक मित्र यांंच्यासह राजकीय मंडळी ही आवर्जून उपस्थित राहतात. मग वधू पिता किंवा वर पिता यांना या मंडळीला नाराज करून चालत नाही.राजकीय व्यक्तीच्या सन्मानाबरोबरच अलीकडे वधूवरांना आशीर्वाद देण्याची एक जणू प्रथाच रूढ झाली आहे. यामुळे लग्न देखील वेळेवर लागत नाही.त्यामुळे विवाह सोहळ्यासाठी उपस्थित असलेले अनेक मान्यवर फक्त लग्नाअगोदर भेट घेऊन निघून जातात. या उपस्थित मान्यवरांचा दोन्ही परिवाराकडून फेटे बांधून सत्कार केला जातो.यामध्ये व्यर्थ खर्च होतो परंतु आष्टीमध्ये केळसांगवी येथील काकासाहेब पडोळे यांची कन्या वैष्णवी आणि धानोरा येथील सामाजिक कार्यकर्ते नामदेव शेळके यांचा मुलगा महेश यांचा शुभविवाह नुकताच आष्टीतील श्री दत्त लॉन्स येथे साधुसंत,राजकीय नेते, नागरिक या जनसमुदायाच्या उपस्थितीत शाही थाटात संपन्न झाला.या दोन्ही परिवाराने यावेळी कोणत्याही व्यक्तीचा सत्कार समारंभ न करता शब्दसुमनाने उपस्थिताचे आभार व्यक्त करत व्यर्थ खर्चाला फाटा दिला. श्री मदन महाराज संस्था केळसांगवी या संस्थेचे संस्थापक ह.भ.प.निळकंठ महाराज तावरे यांना रुपये ११ हजार रूसंस्थेसाठी दान दिले. सत्काराचा व्यर्थ खर्च टाळण्याचा आदर्श पडोळे, शेळके यांनी समाजासमोर उभा केला. या विवाहप्रसंगी ह.भ.प.एकनाथ गायकवाड, ह. भ. प.अनंत हंबर्डे, ह.भ.प.पांडुरंग जाधव गुरुजी, ह.भ.प.निळकंठ तावरे ,ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल या साधुसंतांचे वधू-वरांना आशीर्वाद घेण्यात आले. या विवाह सोहळ्यासाठी आ. सुरेश धस आ.बाळासाहेब आजबे,माजी आ. साहेबराव दरेकर,बापूसाहेब डोके,सरपंच शरद पवार,अण्णासाहेब चौधरी,सतीशआबा शिंदे, अमरराजे निंबाळकर,देविदासआबा धस,संग्रामभैय्या आजबे,काकासाहेब शिंदे, बाबनराव पडोळे ,राजेंद्र धोंडे,पत्रकार उत्तम बोडखे,पुर्व शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे, माजी शिक्षण सभापती नियमित बेग,माजी सभापती अंकुश चव्हाण,परमेश्वरकाका शेळके,माजी सभापती विजयकुमार बांदल,
शिवलिंग लगड,डॉ.गव्हाणे,नामदेव राऊत,पोपटराव घुले सर,केशव चव्हाण,माजी सरपंच महादेव पडोळे,सरपंच सविता शेळके,माजी प्राचार्य रघुनाथ पोकळे,पत्रकार प्रवीण पोकळे,बा.म.पवार,पत्रकार संतोष दाणी,सरपंच अजित घुले आदी उपस्थित होते.

0 टिप्पण्या