उत्तम बोडखे..
'आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने...' या संत उक्ती प्रमाणे आयुष्याच्या अर्ध्याहून अधिक काळ विनासायास निरंतर समाजप्रबोधन आणि धर्म अध्यापन करून गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड करणाऱ्या बीड जिल्ह्याच्या भूमिपुत्राने हरिव्दार येथे नुकतीच जागतिक दर्जाच्या योगगुरु रामदेवबाबांची गळाभेट घेतली आणि धर्म व समाज व्यवस्थेवर काही काळ चर्चा केली.यावेळी त्यांच्यासमवेत अंकुश गवळी सर उपस्थित होते.बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्याचे रहिवासी ह.भ.प.रामकृष्ण रंधवे महाराजांनी नुकतेच स्वकष्टाचे ३५ लाख रुपये खर्च करून विठ्ठलगड संस्थानाची उभारणी केली आहे.मंदिरात मुख्य विठ्ठल रुक्मिणीच्या पावणे पाच उंचीच्या दोन देखण्या मुर्त्या आहेत.विविध संतांची सुंदर मंदिरे यात आहेत.गेल्या महिन्यात ह.भ.प.रंधवेबापूंनी या संस्थानाच्या उद्घाटनासाठी राज्याच्या मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांना उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिलेले आहे. याच अनुषंगाने नुकतीच बापूंनी जागतिक कीर्तीचे योगगुरु रामदेवबाबा यांची भेट घेतली.या भेटीत योगगुरु आणि समाजप्रबोधनकार यांच्यात अत्यंत धार्मिक व मौलिक चर्चा झाली.देशहित समाजहित हीच आपल्या आयुष्याची अंतिम परिपूर्ती आहे .या अनुषंगाने त्यांनी केलेली चर्चा भविष्यात समाज परिवर्तनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असेल यात शंका नाही.पाटोदा येथील धार्मिक क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेल्या समाज प्रबोधनकार ह भ प रामकृष्ण रंधवे बापूंच्या अफाट कार्याला देश आणि जागतिक कीर्तीच्या योग गुरु ठरलेल्या रामदेव बाबांनी मुक्तकंठाने स्वागत व अभिनंदन करुन गळाभेट घेतली आणि बापूंच्या कार्याला मनस्वी शुभेच्छा दिल्या.रंधवेबापूंच्या या महान तेजस्वी,निस्वार्थ कार्या चा अभिमान बीडवासीयांना राहिल, यात शंका नाही!
----------------------------------------------------------




0 टिप्पण्या