Ticker

6/recent/ticker-posts

आष्टीत संत नामदेव महाराज यांच्या सप्त शत्तकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सप्ताहास प्रारंभ ...

 

कलयुगातील २० व्या. शतकातील महान संत प.पू.ब्र.भु. ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर यांचे २३ व्या.पुण्यतिथीनिमित्त व संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या सप्त शत्तकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त अखिल भारतीय वारकरी मंडळ प्रेरीत भव्य अखंड हरिनाम सप्ताह संत शिरोमणी नामदेव महाराज चरित्रकथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होत आहे.या सप्ताहात दररोज दुपारी ह.भ.प.ॲड.धर्माचार्य शंकर महाराज शेवाळे (आळंदी) यांची संत नामदेव महाराज चरित्र कथा होणार आहे.आष्टी शहरातील माऊली नगरातील माऊली मंदिर आवारात २० व्या.शतकातील महान संत ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर यांच्या २३ व्या.पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह दि.२८ मे ते ४ जुन २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.या सप्ताहात काकडा भजन,विष्णु सहस्त्रनाम,गीतापाठ,पसायदान
,ज्ञानेश्वरी पारायण,गाथाभजन,संत शिरोमणी नामदेव महाराज चरित्र कथा,हरिपाठ, हरिकीर्तन,जागर (संगीत भजन) आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.या सप्ताहात दररोज २.३० ते ५.३० संत शिरोमणी नामदेव महाराज चरित्र कथा होणार आहे. या सप्ताहात नामधारक ह.भ.प.
आसाराम महाराज केळसांगवी यांचे नामसंकीर्तन,ह.भ.प.सुधाकर महाराज वाघ,महंत आदिनाथ महाराज शास्त्री, ह.भ.प.शंकर महाराज शेवाळे, ह.भ.प.रामकृष्ण रंधवे बापु, ज्ञानेश्वर माऊली कदम,शनिवार दि.३ जुन रोजी सकाळी १० ते १२ या वेळात ह.भ.प.भागवत महाराज उंबरेकर यांचे १० ते १२ यावेळात पुण्यकालचे कीर्तन होणार आहे तर रात्री ह.भ.प.भागवत बादाडे यांचे कीर्तन होणार आहे.रविवार दि.४ जुन रोजी सकाळी १० ते १२ या वेळात अ.भा.वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.शनिवार दि.३ जुन रोजी सायंकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी,
अभंगगाथा,श्रीमद भागवत,गुरुवर्य संत ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर महाराज ,संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या प्रतिमेची टाळ-मृदंग,ढोल-लेझीम व बॅण्डपथकासह भव्य मिरवणूक होणार आहे. ह.भ.प.बोधले महाराज यांचे काल्याचे कीर्तनास आ.बाळासाहेब आजबे,आ.सुरेश धस,माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर,बीड जि.प.च्या माजी अध्यक्षा सौ.सविताताई गोल्हार,डॉ.शिवाजी राऊत,सतिषआबा शिंदे,आण्णासाहेब चौधरी,हनुमंत थोरवे, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष,जि.प.सदस्य,सभापती,उपसभापती,पं.स.सदस्य,सरपंच मुर्शदपूर,विविध क्षेत्रातील मान्यवर भाविक भक्त उपस्थित राहणार आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या