आष्टी (प्रतिनिधी)
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने बीडसांगवी तालुका आष्टी येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार दि.१५ मार्च रोजी सायंकाळी ५ वा.हा मेळावा होणार असून या मेळाव्यास पुणे येथील प्रेरणादायी व्याख्यात्या शिवमती तेजश्री मुळे,जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्ष शिवमती वर्षाताई माने,तहसीलदार वैशाली पाटील,बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्योती बेलेकर,ॲड. कांतीलाल गव्हाणे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महानंद डेअरीच्या संचालिका शिवमती प्राजक्ताताई धस या
भूषविणार आहेत.यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय उपाध्यक्ष सुवर्णाताई गि-हे,बीड जिल्हाध्यक्ष संगीताताई शिंदे,सरपंच शितल करांडे,मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष इंजि.तानाजी जंजिरे,कार्याध्यक्ष शिवश्री लक्ष्मण रेडेकर यांची उपस्थिती लाभणार आहे.
परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित राहून मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आष्टी तालुका जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने तालुकाध्यक्ष शिवमती आशा करांडे यांनी केले आहे.तानुबाई बिरजे पत्रकार परिषदेच्या

वतीने राज्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींसाठी जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार २०२६ जाहीर केलेले आहेत .या पुरस्कारांचे वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पुरस्कार प्राप्त व्यक्तींना याबाबत वैयक्तिकपणे कळवण्यात आले आहे.संबंधित व्यक्तींनी पुरस्कार स्वीकारण्यासाठी यावेळी हजर राहावे असे आवाहन पुरस्कार निवड समितीचे प्रमुख प्रा.डॉ.बाबासाहेब मुटकुळे आणि अध्यक्ष ॲड.सिताराम पोकळे यांनी कळवले आहे.
0 टिप्पण्या