आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील वाघळुज येथील चौकीतांड्यावरील प्रवीण हा
आर्मीमध्ये नोकरीला असून तो मागील काही दिवसांपासून सुट्टीवर गावी आला होता. दि. ८
डिसेंबर रोजी दोघाभावात मारामारी झाली. या मारहाणीत प्रवीण याला मार लागल्याने
त्याला अहमदनगर येथील रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले परंतु शनिवारी पहाटे
चारच्या दरम्यान त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळताच अंभोरा
पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. तपास अंभोरा पोलिस करीत आहेत. मयताच्या पत्नीच्या
फिर्यादीवरून सासु झुंबरबाई पवार, सासरे विनायक पवार, सून सोनाली पवार,भाऊ विनोद
पवार याच्या विरोधात अंभोरा पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत
0 टिप्पण्या