आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदार संघातुन विधानसभा निवडणुकीसाठी माजी आ.भीमराव धोंडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कसलाही गाजावाजा न करता अगदी साध्या पद्धतीने मोजक्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वसिमा शेख आणि साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार श्रीमती वैशाली पाटील यांच्याकडे माजी आ. भीमराव धोंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.याप्रसंगी युवा नेते अजयदादा धोंडे,माजी सभापती ॲड.साहेबराव म्हस्के,अभयराजे धोंडे, राजेंद्र धोंडे,रामराव खेडकर,लालाभाऊ कुमकर,अशोक सवासे, उपसभापती पांडुरंग नागरगोजे,दिलीप म्हस्के, माजी शिक्षण सभापती नियामत बेग,अशोक साळवे,बाजीराव वाल्हेकर,जेष्ठ नेते विठ्ठलराव बनसोडे, माजी सभापती सौ. सुवर्णाताई लांबरुड, ॲड.अशरफ शेख,बाबु कदम,पांडुरंग गावडे, बाळासाहेब पवार,ॲड. रत्नदिप निकाळजे, शंकर देशमुख,उत्तम बोडखे,बाबा ससाणे, संजय धायगुडे,चंद्रशेखर साके,सरपंच दादासाहेब जगताप,रघुनाथ शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या